अटल पेंशन योजना
अटल पेंशन योजना ही एक सरकारी योजना आहे, जी विशेषतः असंघटित क्षेत्रात (उदा. खाजगी नोकरी, छोटे व्यापारी, रोजगार, मजुरी इ.) काम करणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्य प्रदान करते. ग्राहकाच्या योगदानानुसार, ही योजना वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत खात्रीशीर पेंशन लाभ देते.
पात्रता काय आहे?
खालील निकषांची पूर्तता करणारा प्रत्येक भारतीय अटल पेंशन योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- वय: 18 ते 40 वर्षे
- बॅंक बचत खाते: बॅंक बचत खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत खाते असणे आवश्यक.
- करदाता: 1 ऑक्टोबर 2022 पासून जो भारतीय आयकर भरत आला आहे किंवा भरत होता, तो अटल पेंशन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
नोंदणी कशी कराल?
- बॅंक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन, आपल्या बचत खात्याच्या माध्यमातून नोंदणी करा. खाते नसल्यास, MDCC मध्ये सोप्या व झटपट पद्धतीने खाते उघडू शकता.
- अटल पेंशन योजनेचा फॉर्म भरा.
- तुमचे आधार कार्ड, तसेच मोबाईल नंबर संबंधित अधिकाऱ्याकडे द्या.
- तुमच्या पसंतीनुसार, मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक या पद्धतीने रक्कम जमा करा.
- ऑटो-डेबिटसाठी पुरेसे पैसे खात्यात असल्याची नेहमी खात्री करा.
योगदान तक्ताः
तुम्ही प्रत्येक महिन्याला किती रक्कम जमा कराल, हे तुम्हाला हवी असलेली पेन्शन रक्कम आणि तुम्ही नोंदणी करत असलेल्या वयावर अवलंबून आहे.
दरमहा खात्रीशीर ₹1,000 पेंशन मिळविण्यासाठी, किती रक्कम जमा करावी लागेल, याचा अंदाज घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता पाहा:
वय | योगदानाची वर्षे | ₹.1000 मासिक पेंशन लाभ! ₹1.7 लाखाच्या निधीवर नॉमिनीला मिळणारा अंदाजे परतावा | ₹.2000 मासिक पेंशन लाभ! ₹3.4 लाखाच्या निधीवर नॉमिनीला मिळणारा अंदाजे परतावा | ₹.3000 मासिक पेंशन लाभ! ₹5.1 लाखाच्या निधीवर नॉमिनीला मिळणारा अंदाजे परतावा | ₹.4000 मासिक पेंशन लाभ! ₹6.8 लाखाच्या निधीवर नॉमिनीला मिळणारा अंदाजे परतावा | ₹.5000 मासिक पेंशन लाभ! ₹8.5 लाखाच्या निधीवर नॉमिनीला मिळणारा अंदाजे परतावा |
---|---|---|---|---|---|---|
18 | 42 | 42 | 84 | 126 | 168 | 210 |
19 | 41 | 46 | 92 | 138 | 183 | 228 |
20 | 40 | 50 | 100 | 150 | 198 | 248 |
21 | 39 | 54 | 108 | 162 | 215 | 269 |
22 | 38 | 59 | 117 | 177 | 234 | 292 |
23 | 37 | 64 | 127 | 192 | 254 | 318 |
24 | 36 | 70 | 139 | 208 | 277 | 346 |
25 | 35 | 76 | 151 | 226 | 301 | 376 |
26 | 34 | 82 | 164 | 246 | 327 | 409 |
27 | 33 | 90 | 178 | 268 | 356 | 446 |
28 | 32 | 97 | 194 | 292 | 388 | 485 |
29 | 31 | 106 | 212 | 318 | 423 | 529 |
30 | 30 | 116 | 231 | 347 | 462 | 577 |
31 | 29 | 126 | 252 | 379 | 504 | 630 |
32 | 28 | 138 | 276 | 414 | 551 | 689 |
33 | 27 | 151 | 302 | 453 | 602 | 752 |
34 | 26 | 165 | 330 | 495 | 659 | 824 |
35 | 25 | 181 | 362 | 543 | 722 | 902 |
36 | 24 | 198 | 396 | 594 | 792 | 990 |
37 | 23 | 218 | 436 | 654 | 870 | 1087 |
38 | 22 | 240 | 480 | 720 | 957 | 1196 |
39 | 21 | 264 | 528 | 792 | 1054 | 1318 |
40 | 20 | 291 | 582 | 873 | 1164 | 1454 |
तुम्हाला अटल पेंशन योजनेची गरज का आहे?
एपीवाय (अटल पेन्शन योजना) तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते.
- ‘अटल पेंशन योजना’ म्हणजे, तुम्ही निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी केलेली आर्थिक तरतूद आहे!
- वयाच्या 60व्या वर्षांनंतर दरमहा पेन्शन मिळाल्यामुळे, उतारवयात आर्थिक सुरक्षिततेची खात्री मिळते!
- विशेषतः असंघटित क्षेत्रात (उदा. खाजगी नोकरी, छोटे व्यापारी, रोजगार, मजुरी इ.) काम करणाऱ्यांना पेंशनचा लाभ मिळतो!
- वयाच्या वाढीसोबत काम करण्याची मानसिक, शारीरिक क्षमता कमी होऊ शकते; अशा परिस्थितीत ‘अटल पेंशन योजना’ आर्थिक पाठबळ देते!
फायदेः
- खात्रीशीर पेंशन लाभ तुमच्या योगदानावर आधारित दरमहा ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत खात्रीशीर पेंशन लाभ.
- सरकारी योगदान भारत सरकारच्या पाठिंब्यामुळे पारदर्शकता व विश्वासार्हता.
- आर्थिक लवचिकता पसंतीनुसार रक्कम जमा करण्याची मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक पद्धत.
- ऑटो-डेबिट सुविधा थेट तुमच्या खात्यातून सुरक्षित योगदान.
- सहज माहितीचा पुरवठा www.npscra.nsdl.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, तुम्ही तुमच्या खात्याबद्दलची माहिती, PRAN (कार्ड, खाते क्रमांक) तसेच व्यवहारांचे तपशील सहज पाहू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्नः
- अटल पेंशन योजनेअंतर्गत प्रत्यक्ष PRAN कार्ड मिळविण्यासाठी मला काय करावे लागेल?
this website या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, आवश्यक्य शुल्क भरून, तुम्ही प्रत्यक्ष PRAN कार्ड मिळविण्यासाठी विनंती करू शकता. APY PRAN कार्ड प्रिंट करू शकता.
- अटल पेंशन योजनेसाठी नोंदणी केल्यानंतर मला प्रत्यक्ष व्यवहारांचा तपशील मिळेल का?
होय, अटल पेंशन योजनेसाठी नोंदणी केल्यानंतर वर्षातून एकदा नोंदणीकृत पत्त्यावर प्रत्यक्ष व्यवहारांचे तपशील पाठवले जातील.
- माझ्या अटल पेंशन योजनेच्या खात्यासंबंधीचे प्रश्न कुठे विचारावेत?
तुमचे सर्व प्रश्न APY-SP शाखेला विचारावेत.
- मी अटल पेंशन योजनेत केलेल्या योगदानाबद्दलची माहिती मला कशी प्राप्त होईल?
CRA-NSDL कडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS च्या माधमातून तुम्हाला माहिती पाठवली जाईल.
- मी माझी वैयक्तिक माहिती कशी अपडेट करू शकतो?
तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह APY-SP शाखेत लेखी अर्ज द्यावा लागेल.
- मी वयाच्या 60 वर्षांपूर्वी अटल पेंशन योजनेतून बाहेर पडू शकतो का?
होय, तुम्हाला खाते बंद करण्याचा फॉर्म भरून, तुमच्या APY-SP शाखेत द्यावा लागेल. संबंधित फॉर्म this websiteया अधिकृत वेबसाईटवरून किंवा ब्रांचमधून घेऊ शकता.
- ग्राहकाचे निधन झाल्यास अटल पेंशन योजनेच्या खात्याचे काय होते?
मासिक पेंशन जोडीदाराला दिली जाते. आणि समजा, पती-पत्नी दोघांचेही निधन झाले, तर पेंशन जोडीदाराव्यतिरिक्त असलेल्या संबंधित नॉमिनीला दिली जाते.
- मी अटल पेंशन योजनेतील पेंशनची रक्कम वाढवू अथवा कमी करू शकतो का?
होय, तुम्ही एप्रिलमध्ये वर्षातून एकदा फॉर्मच्या माध्यमातून पेंशनची रक्कम वाढवू अथवा कमी करू शकता.
- मी माझ्या योगदानाची वारंवारता (मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक) बदलू शकतो का?
होय, तुम्ही तुमच्या APY-SP शाखेला लेखी विनंती करून, योगदानाची वारंवारता बदलू शकता.
- मी अटल पेंशन योजनेअंतर्गत एखादी तक्रार कशी करू शकतो?
पोर्टलद्वारे तुम्ही मोफत तक्रार करू शकता. NPS-Lite नेव्हीगेट करा. मग आपली तक्रार नोंदवा. तिथे तुम्हाला एक टोकन नंबत दिला जाईल, ज्याच्या माध्यामातून तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती पाहू शकता.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:
PFRDA Website: :https://www.pfrda.org.in/
NSDL Website:www.npscra.nsdl.co.in
NPS Trust Website:http://www.npstrust.org.in
APY Social Media: