Chairman Message

अध्यक्षांचा संदेश

आदरणीय अतिथी,

आमच्या बँकेच्या वेबसाईटवर आल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड. ही मुंबई जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त सहकारी संस्थांची केंद्रीय वित्तीय संस्था आहे.ही बँक ‘मुंबई बँक’ या नावाने ओळखली जाते.१९७४ साली एमसीएस अधिनियमांतर्गत या बँकेचे नोंदणीकरण करण्यात आले आणि १२ फेब्रुवारी १९७५ पासून या बँकेचे कार्य सुरु झाले. या जिल्ह्यात कृषी उत्पादन नसल्यामुळे मुंबई बँक बिगर-कृषी सहकारी संस्था जसे की शहरी सहकारी बँका, शहरी सहकारी क्रेडिट सोसायटीज, कर्मचारी सहकारी क्रेडिट सहकारी सोसायटीज, सहकारी ग्राहक स्टोअर, औद्योगिक, मत्स्य आणि कामगार सहकारी सोसायटीज इत्यादींच्या अर्थ विषयक गरजा पुरवते.

मुंबई बँकेची तुम्ही निवड केल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. मुंबई बँकेचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, की बँकेच्या सर्व कार्यभागाचे ध्येय निश्चित करुन सहकारी बँकांच्या क्रमवारीत अग्रस्थानी राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

ग्राहकांच्या गरज पूर्ण करताना आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करु.

मी तुम्हाला सांगू इच्छितो, की सर्व ग्राहक आमचे सामर्थ्य आहेत, जे आम्हाला त्यांच्या निष्ठेमुळे पुरस्कृत करतात. त्या सर्व ग्राहकांचा मी नेहमीचं आभारी राहीन.

आमच्यासोबत बँकेचा व्यवहार करण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो.

माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

आपला विश्वासू,

श्री. प्रवीण दरेकर

chairman_aboutus

MDCC Logo