ई-स्टेटमेंट
ई-स्टेटमेंटसाठी नोंदणी करण्यासाठी तुमच्या स्वगृही शाखे मध्ये संपर्क करा.
कृपया :
नियम आणि अटी
- ज्या शाखेत ग्राहकाचे खाते आहे त्या शाखेच्या ठरलेल्या नमुन्यानुसार त्यांनी अर्ज देणे आवश्यक आहे.
- ग्राहकांना ई-स्टेटमेंट सुविधेकरीता पात्र ठरण्यासाठी त्यांना सध्या वापरात असणारे ई-मेलआयडीची नोंदणी करावी लागणार.
- ग्राहकांना त्यांची पूर्ण आणि योग्य माहिती भरणे आवश्यक आहे. ग्राहकांनी जर अपूर्ण माहिती भरली तर त्यास बँक जबाबदार राहणार नाही.
- ई-स्टेटमेंट सुविधेसाठी ग्राहकांना नाकारण्याचा अधिकार बँकेला आहे.
- संयुक्त खात्याकरिता ई-स्टेटमेंट सुविधेसाठी सर्व खाते धारकांना अर्जावर सही करणे आवश्यक आहे.
- नोंदणीकृत सहकारी संस्था आणि कंपन्यांमध्ये अधिकार प्राप्त व्यक्तींना ई-स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्जासोबत ठरावाची प्रत देणे आवश्यक आहे.
- ग्राहकांना दिलेल्या ई-स्टेटमेंट सुविधेत बदल करण्याचा अधिकार बँकेला आहे. याचसोबत ई-स्टेटमेंट सुविधा ठराविक कालावधीमध्ये काही वेळ किंवा पूर्णपणे खंडित करण्याचा अधिकार बँकेला आहे.
- बँक विविध सुविधांबाबतीत सूचना/माहिती ग्राहकांना ई-मेल द्वारे पाठवू शकते. या ई-मेल करिता ग्राहक कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेऊ शकत नाही.
- बँकेने ई-स्टेटमेंट सुविधेद्वारे पाठविलेल्या माहितीच्या गोपनियतेबद्दल पूर्णपणे स्वतः जबाबदार राहणार. ही माहिती बाहेर पसरल्यास बँक जबाबदार राहणार नाही.
- ग्राहकाव्यतिरिक्त या सुविधा इतर कुणी वापरात असेल तर त्यानंतर बँक जबाबदार राहणार नाही.
- या सुविधा इंटरनेट सुविधा, अंतर्गत तांत्रिक पद्धतीवर अवलंबून आहे, या गोष्टीची ग्राहकांनी नोंद घेणे आवश्यक आहे. या सुविधा अविरत सुरु राहणार याकरीता बँक जबाबदार नाही.
- जर एखाद्या ग्राहकाला या सुविधांमध्ये अडचणी दिसून आल्या तर त्या व्यक्तीने बँकेला कळवावे. या सुविधा पूर्ववत करण्यासाठी बँक नक्कीच सकारात्मक प्रयत्न करणार.
- जर ग्राहकाला या सुविधा नको असतील तर त्याने ई-मेलचे नोंदणीकरण कमी करण्यासाठी त्वरित बँकेला लिखित कळवावे.
- जर ग्राहक वापरत असलेल्या सुविधांमधील ई-मेल आयडी मध्ये बदल करण्यासाठी बँकेला लिखित कळवावे.
- सध्या बँक या सुविधांवर मोफत पुरवीत आहे. परंतु पुढील काळामध्ये या सुविधांवर काही शुल्क लागू करू शकते.