

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने स्वयंपूर्ण विकास योजनेअंतर्गत विकसित झालेल्या चारकोप श्वेतांबरा गृहनिर्माण सोसायटीची स्वप्नपूर्ती!
मुंबई बँकेच्या *गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास अभियान* अंतर्गत मुंबई बँकेच्या आर्थिक सहाय्याने विकसित झालेल्या *श्र्वेतांबर गृहनिर्माण संस्थेच्या चावी वाटपाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते* तसेच बँकेचे *अध्यक्ष आमदार श्री. प्रविणभाऊ दरेकर* यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ,दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता *छत्रपती शिवाजी राजे मैदान, सेक्टर-१ , चारकोप,* कांदिवली (प ) मुंबई- ६७ येथे संपन्न झाला.
त्या प्रसंगी *केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पियुषजी गोयल, माजी खासदार श्री.गोपाळजी शेट्टी, आमदार श्री. प्रसादजी लाड, आ. श्री.अतुलजी भातखळकर, आ. श्रीमती चित्राताई वाघ, आ. श्री. निरंजनजी डावखरे, आ. श्री.संजय उपाध्यायजी, आ. श्रीमती स्नेहाताई पंडित-दुबे, आ. श्री. प्रकाशजी सुर्वे, आ. श्री. प्रशांतजी ठाकूर,माजी मंत्री श्री.भाई गिरकर,मुंबई बँकेचे उपाध्यक्ष श्री. सिध्दार्थजी कांबळे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाशजी दरेकर, मुंबई बँकेचे संचालक सर्वश्री. शिवाजीरावजी नलावडे, नंदकुमारजी काटकर,नितिनजी बनकर,आनंदरावजी गोळे,अनिलजी गजरे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री.राजेंद्र क्षिरसागर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्याधिकारी श्री.महेंद्र कल्याणकर, गृहनिर्माण मंडळाचे मुख्याधिकारी श्री.मिलिंद बोरीकर बँकेचे कार्यकारी संचालक श्री. डी. एस. कदम, मुख्यसरव्यवस्थापक श्री संदीप सुर्वे* तसेच मुंबई बँकेचे व हौसिंग फेडरेशनचे सर्व संचालक, वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.






















