
महिनाः एफ वाय


तिसरी उपनगरी पुनर्विकास परिषद


तिसरी उपनगरी पुनर्विकास परिषद



मुख्यमंत्री मदत निधीसाठी योगदान


मुख्यमंत्री मदत निधीसाठी योगदान



देवेंद्र फडणवीस सीएम महाराष्ट्र प्रवीण दरेकर आणि इतर सहा


देवेंद्र फडणवीस, सीएम महाराष्ट्र, प्रवीण दरेकर आणि इतर सहा.



स्वयं-पुनर्विकासासाठी बँकेच्या दारात ५00 गृहनिर्माण संस्था


स्वयं-पुनर्विकासासाठी बँकेच्या दारात ५00 गृहनिर्माण संस्था



पालटा तुमच्या इमारतीचं रुपडं मुंबई बँक करेल तुम्हाला अर्थसाहाय्य


पालटा तुमच्या इमारतीचं रुपडं, मुंबई बँक करेल तुम्हाला अर्थसाहाय्य!

स्ट्रक्चरल ऑडिटच्या बाबतीत मुंबई व उपनगरी भागातील हजारो सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स सध्या चांगल्या स्थितीत नाहीत. खरं तर, बऱ्याच गृहनिर्माण अपार्टमेंट्सची अवस्था इतकी मोडकळीस आलेली आहे की त्यांना त्वरित पुनर्निर्मितीची आवश्यकता आहे. जुन्या गृहनिर्माण इमारती देखीलजीर्ण अवस्थेत आहेत आणि जर्जर झाल्या आहेत. याशिवाय या गृहनिर्माण संस्थांना निधीच्या कमतरतेमुळे इमारतीची दुरुस्ती करणे किंवा सुशोभीकरण करणेअवघड होऊन बसते. इमारतींच्या वृद्धत्वामुळे त्यामध्ये वास्तव्य करणाऱ्यालोकांचे जीवनही धोक्यात आले आहे. अशा संपार्श्विक नुकसानीच्या स्थितीत तुम्हाला साहाय्य करतेमुंबईतील अग्रगण्य सहकारी बँक अर्थात मुंबईजिल्हा केंद्रीय सहकारी बँक लिमिटेड, जी मुंबई बँक या नावाने सर्वदूर प्रसिद्ध आहे.
अतिरिक एफएसआयचा वापर:-
सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांना कोणत्याही प्रकारच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी आणि मदतीची असलेली गरजमुंबई बँकेनेउत्तम प्रकारेहेरली आहे. खरतरं जुन्या इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती करणे हे केवळ जखमेवर मलमपट्टी करण्यासारखे आहे. जुन्या मुंबईतील बहुतेक इमारतींना २५ वर्षांपेक्षा जास्तच काळ लोटला गेल्याने त्यांची पूर्ण डागडुजी करणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनचजुन्या इमारतींची पूर्ण दुरुस्ती करून, अतिरिक्त एफएसआयचा वापर करून, सर्व सोयींनी सुसज्ज अशा नव्या, उंच, देखण्या इमारतीमध्ये तिचे रुपांतरण करणे गरजेचे ठरते.
कोणत्याहीमध्यस्थ विकासकाशिवाय अशा प्रकारच्या डागडुजीसाठी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्सना थेट निधी पुरवण्याचा हा अनोखा मार्ग मुंबई बँक घेऊन आली आहे. दुरुस्तीचा खर्च हा सामान्यत: अतिशय जास्त असतो जो कि बऱ्याचदागृहनिर्माणसंस्थेच्या एकूण जमा रकमपेक्षाही जास्त असू शकतो. यासमस्येमध्ये मुंबई बँक आपल्या सर्वोत्तम जलद सेवेमार्फत तुम्हाला सहाय्य करते!
बँकेची तीन मुख्य उद्दिष्टे:
गृहनिर्माण संस्थांना साहाय्य करण्यासाठी मुंबई बँकेने खालीलप्रमाणे तीन मुख्य उद्दिष्टे निर्धारित केली आहेत
- एफएसआय आणि मुंबई बँकेकडून मिळणारा वित्तपुरवठा वापरून, संपूर्ण जुने बांधकामतोडून नवीन इमारत उभारणे.
- अतिरिक्त एफएसआयवापरूनआणि बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून इमारतीच्या बाजूला लागून असलेल्या अधिकच्या रिकाम्या जागेवर नवीन इमारत बांधणे
- जरस्ट्रक्चरल ऑडीट नुसार सध्याची इमारत सुस्थितीत असले तर अतिरिक्त एफएसआयवापरूनआणि बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून ती इमारत सुशोभित करणे.
सुरक्षिततेला प्राधान्य:
वरील ३ उद्दिष्टे केवळ गृहनिर्माण संस्था/अपार्टमेंट्सना त्यांच्या सध्याच्या जुनाट, बिघडलेल्याइमारतीचं केवळ सुंदर आणि आकर्षक रुपांतरण करण्यात सहाय्य करणार नाहीत तर पूर्वी जो धोका होता, तो दूर करून रहिवाश्यांच्या जीवाला कोणतेही नुकसान होणार नाही याची शाश्वती घेत सोयीसुविधांनी सुसज्जअसे उत्तम गृहनिर्माण संकुल उभारण्याची हमी देतात.
मध्यस्थाला दूर करणे:
मुंबई बँकेच्या योजनेचा सर्वोत्तम भाग म्हणजे वित्तसहाय्य हे थेट सहकारी गृहनिर्माण संस्थांना कर्ज म्हणून दिले जाईल. त्यात रीअॅलिटी डेव्हलपर्स किंवा बिल्डरचा कोणताही सहभाग असणार नाही. यामुळे सोसायटीचा भांडवली खर्च अतिशय कमी होतो, कारण ते स्वत: त्यांना परवडणाऱ्याआर्किटेक्ट / कंत्राटदारला काम देऊन अतिरिक्त खर्च वाचवू शकतात. सोसायटी हीच बँकेची थेट कर्जदार असेल आणि दिलेले कर्ज परत देण्यासाठी त्यांना ७ वर्षांचा अवधी दिला जाईल.
म्हणूनच या योजनेचे नाव इमारत बांधकामचा “स्वयं पुनर्विकास” असे ठेवण्यात आले आहे. ९,००० पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था या मुंबई बँकेच्या सदस्य आहेत. ज्या या “स्वयं पुनर्विकास” कर्ज सेवेचा लाभ घेऊ शकतात. जर एखाद्या सोसायटीकडे सदस्यता नसेल तरी काही समस्या नाही. त्या सोसायटीने सदस्य होण्यासाठी अर्ज करावा आणि आपल्या सुरक्षित इमारतीच्या निर्माणासाठी स्वयं पुनर्विकास कर्जाचा लाभ घ्यावा.
सरळप्रक्रिया आणि सहज संपर्क:
मुंबई बँकेचे मुख्यालय डी.एन. मार्ग, फोर्ट येथे असून मुंबईउपनगरामध्ये ५३ शाखा स्थित आहेत, जेथे जाऊन सहकारी गृहनिर्माण संस्था उपरोक्त कामासाठी संपर्क साधू शकतात. या”स्वयं पुनर्विकास” योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया देखील अगदीसोपीआहे. कर्ज सुविधा मिळवण्यासाठी जवळच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधल्यास सोसायटी प्रतिनिधी/ पदाधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाईल. कर्ज मर्यादा ही प्रकल्प खर्चाच्या ८५% इतकी किंवा ५० कोटी पर्यंत जी रक्कम कमी असेल तेवढी ग्राह्य धरण्यात येईल. तसेचआमच्या माध्यमातून एनबीएफसीतर्फे१५% मार्जिन योगदान, टाय-अप कर्ज सुविधा मिळवून दिली जाऊ शकते. तुम्हाला सर्वोत्तम सेवा प्रदान करणे हीच आमची खरी ताकद आहे.
गृहनिर्माण संस्थांसाठी ही स्वयं पुनर्विकास योजना राबवून मुंबई बँक समाज कल्याणाचेच काम करीत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
