दावा न केलेल्या ठेवी

दावा न केलेल्या डिपॉझिटवर दावा कसा करायचा?

खाते ऑपरेट करायचे असल्यास ग्राहकाने पुढील गोष्टी पाळाव्यात…

  1. जर ग्राहकाला आपल्या खाते पुन्हा एक्टिव्हेट किंवा सुरु ठेवायचे असल्यास, खातेधारकाने अद्ययावत KYC डॉक्युमेंटस् बॅंकेकडे जमा करावी.
  2. चालू खाते उघडण्याच्या औपचारिकतेचे पालन करत बॅंक एक युनिक क्रमांकाखाली नवे खाते उघडणार
  3. खाते उघडताना रोख रक्कम भरावी लागणार. मात्र चालू खात्यात किमान शिल्लक रक्कम उपलब्ध असल्यास ती नव्या खात्यात स्थलांतरित केली जाणार.

केवीयसी अपडेट करणे आवश्यक. डिपॉझिटवर दावा करण्यासाठी ते जमा करणे आवश्यक आहे. बचत ( सेविंग) आणि चालू खाते ( करंट अकाऊंट) मधील मुदत ठेवीसाठी लागणाऱ्या केवायसी डॉक्टयुमेटस् ची यादी नमूद केली आहे.

दावा न केलेल्या डिपॉझिटवर दावा करण्याची प्रक्रिया…

अर्जदाराला ( खातेधारकाला) बॅंकेच्या वेबसाईटवर दावा न केलेल्या ठेवींच्या यादीमध्ये त्यांचे नाव आणि पत्ता तपासावे लागेल. त्यानंतर खाते सुरु ठेवण्याकरता संबंधित बॅंकेच्या शाखेला भेट देता येईल.

दावा न केलेल्या ठेवींच्या दाव्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे:

  1. पासबुक / टर्म डिपॉझिट रिसीप्टस् ( मुदत ठेव पावत्या)
  2. दोन फोटो, अधिकृत ओळखपत्र, रहिवासी दाखला (केवीयसी डॉक्युमेंटस् ) पडताळणीसाठी या सर्वांची मूळ/ओरिजिनल कागदपत्रे

क्लीक करा दावा न केलेल्या ठेवींची यादी इथे पाहा….


MDCC Logo