पॉझिटिव्ह पे सिस्टम
धनादेश वटवण्याची‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’
आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, 7 जानेवारी 2021 पासून, RBI ने बँकांना रुपये 5,00,000/- व त्याहून अधिक रकमेचे धनादेश जमा करणाऱ्या ग्राहकांना ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम काय आहे?’ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आहे.
पॉझिटिव्ह पे सिस्टम काय आहे?
धनादेश व त्यासंबंधित व्यवहारांमध्ये ग्राहकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी, तसेच त्यातील फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी RBI ने ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम ’ सुरू केली आहे. या प्रक्रियेसाठी, धनादेश जमा करणाऱ्या व्यक्तीला, पैसे देणाऱ्या बॅंकेकडे धनादेशाचा तपशील (जसे की, तारीख, इंंस्ट्रुमेंट नंबर, रक्कम इ.) सादर करणे गरजेचे आहे. यामध्ये, चेक ट्रंकेशन सिस्टमद्वारे (CTS) जमा केलेला धनादेश व त्याचा तपशील यांची उलट तपासणी केली जाईल आणि त्यात काही त्रुटी आढळल्यास, त्या दूर करण्यासाठी संबंधित बॅंकांना माहिती पुरवली जाईल.
वरील संदर्भासह, तुम्ही जवळच्या बॅंक-शाखेला भेट देऊन किंवा ई-मेलच्या माध्यमातून धनादेश जमा केल्याच्या दिवशी किंवा तो प्राप्तकर्त्याला सुपूर्द करण्यापूर्वी, तुमच्याद्वारे जमा केलेल्या रुपये 5,00,000/- व त्याहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे तपशील (उदा. चेकची तारीख, 6 अंकी चेक क्रमांक, रक्कम व प्राप्तकर्त्याचे नाव इ.) देऊ शकता.
कृपया हे लक्षात ठेवा:
१. प्रत्यक्ष बॅंकेत जमा केलेल्या धनादेशांसाठी, प्राप्तकर्त्याला सुपूर्द करण्यापूर्वी किंवा ज्या दिवशी बॅंकेत धनादेश जमा केला जाईल, त्याच दिवशी त्याचा तपशील द्यावा लागेल.
२. धनादेश नाकारला जाऊ नये यासाठी, बॅंकेत जमा केलेल्या धनादेशाचा तपशील व्यवस्थित तपासून पाहा.
३. प्रत्यक्ष बॅंकेत जमा केलेल्या धनादेशांचे तपशील दिले नसल्यास, धनादेश वटवण्याची प्रक्रिया पॉझिटिव्ह पे सिस्टम शिवाय सुरू राहील.
४. पॉझिटिव्ह पे सिस्टम चे प्रमाणीकरण फक्त त्याच धनादेशांसाठी केले जाईल, ज्यांचा तपशील बॅंकेकडे सुपूर्द केला असेल.
५. पॉझिटिव्ह पे तपशील उपलबद्ध असूनही, बॅंकेच्या तपासणीदरम्यान, इतर तांत्रिक वा आर्थिक कारणांमुळे धनादेश परत केला जाऊ शकतो.
इतर कोणत्याही माहितीसाठी किंवा सहकार्यासाठी आमच्या बॅंक कर्मचाऱ्याशी संपर्क साधा.
मॅनेजिंग डायरेक्टर